Breaking News

पुण्यस्मरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील कै.बापूराव मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने नातू अनिल मोरे व परिवारांनी राशीन च्या संकल्प वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊचे वाटप, वसतीगृहाला देणगी व स्नेहभोजन कार्यक्रम घेतला. या उपक्रमाच्या आयोजनाने वसतिगृहातील विद्यार्थी भारावून गेले.
मोरे कुटुंबीयांनी स्तुत्य उपक्रम राबवत राशीन येथील आदिवासी पारधी समाज विकास संस्था संचलित संकल्प वसतिगृह राशीन येथील मुलांना शालेय साहित्य, खाऊ वाटप तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत केली. यावेळी

शंकर पारखे, शरद सोपान सोडनवर, रविंद्र पाडुळे, लालासाहेब कायगुडे, गणपत कायगुडे आदी उपस्थित होते. या दरम्यान संकल्प वसतीगृहाचे अध्यक्ष विजय भोसले, सचिव प्रणिता भोसले, कोमल काळे यांनी मोरे परिवाराचे आभार मानले.