Breaking News

कार्वेतील आरोग्य शिबीराचा उपक्रम स्तुत्य : आ. पृथ्वीराज चव्हाण


कार्वे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील व्यक्तींना अनेकदा कष्टाची कामे करावी लागतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामाजिक बांधिलकीतून आजच्या तरूणांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने आरोग्य शिबीरांचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कार्वे (ता. कराड) येथे मुंबईतील एम्पथी फाऊंडेशन व माजी सरपंच वैभव निवासराव थोरात मित्रपरिवारातर्फे आयोजित मोफत नेत्र चिकित्सा शिबीराच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. शिबीरात एक हजार 671 शिबीरार्थींची नेत्र तपासणी करण्यात आली.

येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी नऊ ते दुपारी सुमारे चार वाजेपर्यंत शिबीर पार पडले. शिबीरास कार्वे परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाच वर्षाच्या लहान मुलांपासून ते वयोवृध्दांनी शिबीरात मोठी गर्दी केली होती. शिबीरात एकूण एक हजार 671 जणांनी सहभाग घेतला त्यापैकी 1288 जणांना शिबीराच्या ठिकाणी चष्म्यांचे वाटप करण्यात आले. 245 जणांचे भिन्न चष्मे असल्याने त्यांना काही मोजक्या कालावधीत चष्मे दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. शिबीरार्थींपैकी 200 जणांवर शस्त्रक्रिया होणार आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शिबीरास सदिच्छा भेट दिली. व शिबीराचा आढावा घेतला. यावेळी आ. आनंदराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, एम्पथीचे प्रोजेक्ट मॅनेंजर दिनेश झोरे, संदिप दबडे, शबाना मुजावर, कराड शहर कॉग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, आबा सूर्यवंशी, प्रकाश पाटील- शेणोलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी सरपंच भीमराव खडके, वैभव थोरात, उपसरपंच संभाजीराव थोरात, माणिकराव थोरात, आनंदराव थोरात, भागिर्थी थोरात यांनी स्वागत केले. नागेश काकडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी वैभव थोरात मित्रपरिवारातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.