Breaking News

विनयभंग, मारहाण, शिवीगाळीचे उंब्रजला परस्परविरोधी गुन्हे दाखल


कराड,(प्रतिनिधी)- कराड तालुक्यातील एका गावातील शाळेतुन घरी जाणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस अडवून तु मला आवडतेस, तू बोलली नाहीस तर मी हाताची नस कापीन, असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी एक जणांवर विनयभंगाचा तर अन्य 14 जणांवर जातीवाचक शिवीगाळ करून  मारहाणप्रकरणी उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

राहुल भानुदास लुगडे (रा.मरळी) असे विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नांव आहे.अनुज जयसिंग डांगे, प्रशांत तानाजी पाटील, संकेत अनिल नलवडे, जयसिंग परबत्ती डांगे,अनिकेत शिवाजी डांगे,ओमकार जयवंत गिरी - गोसावी, फिरोज हसन मुलाणी,अनिकेत दत्तात्रय कळंबेकर,निखिल धनंजय साळुंखे, सोमनाथ अरूण यादव, प्रज्वल रविंद्र मिळशेटे,राहूल विलास साळुंखे, निखिल अनिल नलवडे,अक्षय हणमंत माने सर्व (रा.मरळी ता.कराड) अशी जातीवाचक व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहेत. तपास पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे करीत आहेत.