Breaking News

प्रा.इंद्रजीत भालेराव यांना नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य सेवा पुरस्कार प्रदानअंबाजोगाई (प्रतिनिधी)-: (कै.) नरहर कुरुंदकर स्मृती संस्थेच्यावतीने रविवारी प्रा . इंद्रजीत भालेराव यांना नरहर कुरूंरकर साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह व एकेवीसशे रूपये रोख असे होते . लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते माधव बावगे यांना स्वातंत्र्यसेनानी ऍड .आर.डी. देशपांडे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार देण्यात आला .याचे स्वरूप स्मृतीचिन्ह व अकराशे रुपये रोख असे होते . पोखर्णीचे त्र्यंबक वडसकर यांना संतुकराव भोकरे स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.याचे स्वरूप स्मृतीचिन्ह व पाचशे रूपये रोख असे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरित कारण्यात आले. सत्काराला उत्तर देताना प्रा . इंद्रजित भालेराव म्हणाले , अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शिल्लक रकमेच्या व्याजावर हा पुरस्कार वितरण समारंभ होत असून ती कौतुकाची बाब आहे . याच संमेलनाची प्रेरणा घेऊन आपण साहित्यीक घडलो . यावेळी त्यांनी काही कविता ही सादर केल्या. माधव बावगे म्हणाले , सामाजिक बदलासाठी साहित्य प्रगल्भ असले पाहिजे . साहित्यातून प्रेरणा मिळते .कृतीची जोड दिल्यास समाज घडतो. त्र्यंबक वडसकर म्हणाले , ग्रामिण रंगभुमिच्या विकासाकरिता आपण योगदान दिले . माता आणि माती या दोन्ही महत्वाच्या असतात.अध्यक्षीय समारोप करताना डॉ . खुरसाळे म्हणाले ,साहित्याच्या माध्यमातून जीवन दृष्टी लाभते. साहित्यातून बुध्दीला चालना मिळते . जीवन समृध्द बनते .जीवनाला दिशा मिळते. सुरुवातीला ऑङ. श्रीधर डिघोळे यांनी प्रास्ताविक केले . पाहुण्यांचा परिचय प्रा . शैलजा बरूरे यांनी करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.के. निर्मळे यांनी केले . शेवटी संतराम कराड यांनी सर्वांचे आभार मानले .