जळक्या ऑईल’ची बाजारात तेजी प्रदुषणातही वाढ : वाहनांच्या इंजिनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान


सातारा (प्रतिनिधी) : वाहनांच्या बाहेर पडलेल्या जळक्या ऑॅईलच्या पुनर्विक्रीचा बाजार सातारा तालुका, शहर व उपनगरात तेजीत सुरू आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रूपयांची उलाढाल होत असली तरी फिल्टर केलेले जळके ऑईल वापरल्यामुळे वाहनांच्या इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे प्रदुषणातही वाढ होत आहे. दुचाकी, चारचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता वाढविण्यासाठी इंजिन ऑईलचा वापर केला जातो.

बाजारात विविध प्रकारच्या वाहनांच्या इंजिनांसाठी उपलब्ध असणार्या ब्रँडेड ऑईलची विक्री सुमारे 90 पासून सुमारे प्रतिलिटर 950 रूपयांपर्यंत दराने केली जात असते, परंतू ज्यांना हे महागडे ऑईल खरेदी करणे परवडत नाही ते तुलनेने खूपच स्वस्त असणार्‍या लूज ऑईलकडे वळत आहेत. गॅरेज तसेच सर्व्हिसिंग सेंटरमध्ये वाहनांच्या इंजिनमध्ये वापरून बाहेर काढलेल्या ऑईलला ‘जळके ऑईल’ म्हणतात. हे जळके ऑईल फिल्टर्ड आणि रिफाईंड करण्यात आल्यानंतर लूज ऑईल बनून फक्त 50 ते 80 रूपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते. लूज ऑईलमुळे ब्रँडेड ऑईलच्या विक्रीवर परिणाम होत आहे. काही वर्षांपूर्वी सातारा, कराड परिसरातील गॅरेजवर जळक्या तसेच अशुद्ध ऑईलच्या बेकायदेशीर साठ्यांवर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केला होता. त्यानंतर या व्यवसायावर काही प्रमाणात निर्बंध आले होते. मात्र आज यात पुन्हा लाखो रूपयांची उलाढाल सुरू आहे. लूज ऑईलचा उपयोग डांबरामध्ये भेसळ करण्यासाठीही केला जातो. या भेसळीमुळे ठेकेदाराच्या पैशाची बचत होत असली तरी त्यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणाचा दर्जा खालावत आहे. रस्त्याचे बांधकाम करणारे ठेकेदार हे लूज ऑईलचे मोठे ग्राहक असल्याचे आता पुढे येवू लागले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget