Breaking News

इब्टा’शिक्षक संघटनेचे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर-विद्यागर

बीड (प्रतिनिधी) - इंडियन बहुजन टिचर्स असोिएशन (इब्टा) या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या शिक्षक-शिक्षीकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. या वर्षी देण्यात येणार्या म. ज्योतीबा फुले व क्रातीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पुरस्काराची घोषणा जिल्हा सचिव बाबासाहेब ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह बीड येथे झालेल्या निवड समितीच्या बैठकीत समिती सदस्य शिवाजी सानप, बापु धन्वे, गणपत पाबळे, राजेंद्र गोरे, जानकीराम कुरुंद, बालासाहेब मंदे, विकास घोडके, उत्तरेश्वर वंजारे, गणेश वाघ आदींच्या उपस्थितीत करण्यात आल्याची माहिती संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष अनिल विद्यागर यांनी दिली.