Breaking News

रासपच्या मेळाव्यास उपस्थित राहा : भरत लांबोर


कर्जत : प्रतिनिधी: राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शिवाजी पार्क मुंबई येथे ५ मार्च रोजी धनगर आरक्षण अंमलबजावणी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत होत असलेल्या महामेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रासपचे कर्जत तालुका संपर्क प्रमुख भरत लांबोर यांनी केले आहे.

रासपच्या वतीने धनगर आरक्षण अंमलबजावणी महामेळावा २४ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आला होता. मात्र पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाल्याने हा महामेळावा रद्द करून शिवाजी पार्क मुंबई येथे ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आला आहे.

मेळाव्यात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मुद्द्यावर पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर व मान्यवर भाष्य करणार आहेत.धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पक्षाची निर्णायक ठोस भूमिका या मेळाव्यात मांडली जाणार आहे.या महत्वपूर्ण मेळाव्यास समाज बांधव तसेच रासपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भरत लांबोर यांनी केले आहे.