Breaking News

उत्तर नगर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी उद्या कार्यशाळाकोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ व कोपरगाव तालुका एज्युकेशन संस्थेच्या वतीने बुधवारी (ता. 13) सकाळी दहा वाजता कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ व के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या साकरबेन सोमय्या सभागृहात पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.


पत्रकारांसाठी संरक्षण कायदा, पत्रकारांसाठीची नवी पेन्शन योजना तसेच अन्य बाबतीत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस. एम. देशमुख हे करणार आहेत. कोपरगाव तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष, अ‍ॅड. अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होत आहे. ज्येष्ठ पत्रकार व नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे विश्‍वस्त श्रीकांत बेणी, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, नाशिक विभागीयअधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष यशवंत पवार, कोपरगाव तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव अ‍ॅड. संजीव कुलकर्णी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांचे मार्गदर्शनही होणार आहे.

या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, नेवासे, शिर्डी आदी पत्रकार संघाच्या अध्यक्षांनी तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.