Breaking News

मराठवाड्यात संगीत रुजविण्यासाठी देवगिरी संगीत प्रतिष्ठानची स्थापना


बीड (प्रतिनिधी)-: शास्त्रीय संगीताची रुजवणूक मराठवाड्यात व्हावी म्हणून देवगिरी संगीत प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी औरंगाबाद येथे देवगिरी संगीत प्रतिष्ठानचे उद्घाटन बनारस घराण्याचे जेष्ठ तबलावादक अरविंद आझाद यांच्या हस्ते यांच्या हस्ते होणार आहे.
देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यात १८ ठिकाणी संगीत महोत्सव आणि मैफिलीचे आयोजन करण्यात येणार आहे.बीड, माजलगाव,अंबाजोगाई,औरंगाबाद, पैठण ,जालना ,अंबड, सेलू, जिंतूर, परभणी, नांदेड, माहूर , वसमत , हिंगोली ,लातूर, उदगीर आणि उस्मानाबाद येथे या संगीत सभा व महोत्सव आयोजित केल्या जाणार आहेत.देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने अंबड व सेलू येथे संगीतोत्सव संपन्न झाले असून आज रविवारी औरंगाबाद येथे विवेकानंद महाविद्यालयात सायंकाळी ६ वाजता वत्सलाबाई भीमसेन जोशी स्मृती संगीत सभेचे आयोजन करण्यात आले असून अंकिता जोशी या गायन सादर करणार आहेत.
तर १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी परभणी येथे उस्ताद गुलाम रसूल संगीत महोत्सव होणार असून पहिल्या दिवशी सारंग अर्धापूरकर यांचे सितार वादन, सुहास शास्त्री यांचे तबलावादन, गायत्री वैरागकर यांचे गायन होणार आहे तर १७ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता धनंजय जोशी उस्ताद हन्नूमिया यांचे गायन व उस्ताद उस्मान खॉं यांचे सतारवादन होणार आहे. याच दिवशी सायंकाळी सहा वाजता पंडित रघुनंदन पणशीकर आणि वर्षा जोशी यांचे गायन आणि शितल भांबरे - वैभवी पाठक यांचे ओडिसी नृत्य सादर होणार आहे.वर्षभर मराठवाड्यात आयोजित संगीत सभा आणि संगीतोत्सवाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे