Breaking News

श्रीरामपूर येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण


श्रीरामपूर/प्रतिनिधी: संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या श्रीरामपूर शाखेतर्फे स्वच्छता अभियान व वृक्षरोपणाचा कार्यक्रम  राबवण्यात आला. निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशन तर्फे निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिनी 23 फेब्रुवारीरोजी स्वच्छता अभियान व वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सकाळी 7.30 ते 9.30 संत निरंकारी सत्संग भवन परीसर नॉदर्न ब्रँच व 10 ते 12 वाजेपर्यंत बेलापूर रेल्वे स्टेशन येथील स्वच्छता व झाडे लावण्याचा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

यावेळी बेलापूर स्टेशन मॅनेजर श्रीमान सिंग  यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास आर.पी.एफ. चे निरीक्षक मिना साहेब, आर.पी.एफ. चे उपनिरीक्षक यादव साहेब, पी.टी.ई. ठाकुर साहेब, तसेच संत निरंकारी मंडळाचे मुखी राजकुमारजी, सेवादल संचालक शामजी वधवा, बॅ्रंच चे अकाऊंटंट संतोष कारवाळ, सेवादल शिक्षक योगेशजी माटा, डॉ.शंकरराव मुठे, व सर्व सेवादल सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमास श्रीरामपूर नगर परिषदेचे नगर सेवक अ‍ॅड.संतोष जी कांबळे यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमास गोंधवणी, मुठेवाडगाव, शिरसगाव, वडाळामहादेव, हरेगाव, व श्रीरामपूर परीसरातील सर्व सेवादल व साध संगतचे महापुरुष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष कारवाळ यांनी तर  डॉ.शंकरराव मुठे यांनी आभार मानले.