अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा : कोराणे

कार्वे (प्रतिनिधी): वाहनांची संख्या वाढली आहे, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वाहन चालकांनी अपघात टाळण्यासाठी रस्ते वाहतुकीचे नियम पाळावेत त्याचबरोबर संतुलित वेगाने वाहन चालवून सुरक्षात्मक ड्रायव्हिंग करावे, असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक ॠषिकेश कोराणे यांनी केले.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर 30 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान अर्तंगत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कराड व कृष्णा कारखान्याच्या संयुक्त विद्यामाने आयोजित सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, सेक्रेटेरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे, चिफ इंजिनिअर सुहास घोरपडे, प्रोसेस मॅनेजर डी.जी. देसाई, असि.जनरल मॅनेजर डिस्टीलरी प्रतापसिंह नलवडे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, लेबर वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील, को-जन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, वाहतुक अधिकारी गजानन प्रभुणे, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, पर्चेस ऑफिसर रविंद्र देशमुख, स्टोअर किपर जी. बी. मोहिते, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, उसपुरवठा अधिकारी अजय दुपटे, असि. गोडावून किपर निरंजन पवार यांची प्रमुख उपस्थित होती.

जगदीश जगताप म्हणाले, कृष्णा कारखाना कर्मचारी, उसतोड मजूर व तोडणी वाहतूकदार यांची काळजी नेहमी घेत असतो. त्यांच्यासाठी सुरक्षा साधने उपल्बध करून देत असतो. वाहनचालकांनी वाहतूकीचे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री. जगताप यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. तसेच ऊस वाहतूक करणार्या वाहनांच्या पाठीमागील बाजूस रेडीअम रिफ्लेक्टर असणारे लाल कापड लावण्यात आहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी केले. मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी आभार मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget