भाजपमुळे साधला जातो नागरिकांशी थेट संवाद : महापौर


अहमदनगर/प्रतिनिधी : “भारत के मन की बात मोदी के साथ, नागरिकांनी आपल्या भावना व असणार्‍या समस्या थेट भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयात पोहोचवाव्यात आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून होत असते, भारतीय जनता पार्टीच्या उद्देशाने देशाचे पंतप्रधान यांच्याशी देशातला कोणताही नागरिक थेट संवाद साधू शकतो आणि आपले म्हणणे नोंदवू शकतो. भारतीय जनता पार्टी ही थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेते आणि त्यावर त्वरीत अंमलबजावणी करण्यात येते, त्यामुळेच आज भारतातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे पाहिले जाते’’, असे मत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केले.

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप सरकारने सरकारी योजनांची व त्यांनी केलेल्या कामांची माहिती जनतेला होण्यासाठी 48 मतदार संघांमध्ये सरकारी योजनांचा प्रसार करणार आहे. त्यासाठी उस्मानाबाद येथील एका युवकाकडून 44 रथ बनवून घेण्यात आलेले असून त्यात एलईडीद्वारे माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. रथामध्ये ठेवलेल्या लॅपटॉपमध्ये जनतेला आपली मते नोंदविता येणार आहे. या रथाचा शुभारंभ सावेडी, प्रोफेसर चौक येथे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला.
संघटन सरचिटणीस किशोर बोरा म्हणाले, “नागरिकांच्या जनहिताच्या योजना सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात सुरु केले आहे. शेतकर्‍यांच्या पाणीप्रश्‍नासाठी भारतातसह महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प सुरु करुन त्यांचा मोठा प्रश्‍न सोडविण्याचे काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केले आहे, असे अनेक धाडसी निर्णय साडेचार वर्षात घेऊन भारताच्या जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे जनता ही भारतीय जनता पार्टीशी जुळलेली आहे.’’
याप्रसंगी संघटन सरचिटणीस किशोर बोरा, नगरसेवक भैय्या गंधे, रवींद्र बारस्कर, विवेक नाईक, सतीश शिंदे, सुजित खरमाळे, अमित गटणे, जालिंदर शिंदे, संतोष शिंदे, पुष्कर कुलकर्णी, नीलेश जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget