Breaking News

शरद कृषी महोत्सवाचा लाभ घ्या : मकरंद पाटीललोणंद, (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना नवीन कृषीतंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून लोणंद येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. लोणंदच्या शरद कृषी महोत्सवाचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन वाइे आ. मकरंद पाटील यांनी केले.

लोणंद येथील सुवर्णगाथा उत्सव समिती, साद सोशल ग्रुप, श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान, जननायक आमदार मकरंद पाटील विचार मंच, कृषी व पशुसंवर्धन विभाग,सातारा जिल्हा परिषद, यांच्यावतीने दि 14 ते 18 फेब्रुवारी या कालवधीत लोणंद बाजारतळ येथे शरद कृषी, औद्योगिक,पशुपक्षी महोत्सव या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या शरद कृषीप्रदर्शन मंडप उभारणीचा शुभारंभ आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ,जिल्हा परिषद सदस्या दिपाली सांळुखे, डॉ. नितिन सावंत , नगराध्यक्ष सचिन शेळके , हनमंत शेळके लक्ष्मण शेळके, सुभाष घाडगे, योगेश क्षीरसागर, दिपाली क्षीरसागर, कृष्णाबाई रासकर, सागर शेळके, शिवाजीराव शेळके , गजेंद्र मुसळे, विकास केदारी, संभाजी घाडगे, हरिशचंद्र माने, जालिंदर रासकर, गणीभाई कच्छी, विठ्ठल शेळके, भरत शेळके, रविंद्र क्षीरसागर, आदी उपस्थित होते. आ. मकरंद पाटील म्हणाले, लोणंद बाजार तळावर पाच दिवसाचे कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यामध्ये अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी संशोधन, कृषी आवजारे, पशुपक्षी, प्रदर्शन यंत्रे वाहने, औद्योगिक आदी सुमारे तीनेशे स्टॉल सहभागी होणार आहेत. शेती विषयी तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यत पोहोचवण्यासाठी या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करा. शरद पवारांनी कृषीमंत्री पदाच्या माध्यमातून केलेली कृषीक्रांती या शरद कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकर्‍यांपर्यत पोहोचणार आहे. त्यामुळे याचा शेतकर्‍यांना मोठा लाभ होणार आहे. स्वागत हणमंत शेळके यानी केले.