Breaking News

उत्कृष्ट कामगिरीबद्दल औंध पोलिसांचा नांगरे-पाटील यांच्या हस्ते सन्मान


औंध (प्रतिनिधी) : औंध पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या हस्ते औंध पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील जाधव,पोलीस नाईक प्रशांत पाटील व किरण जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

सातारा पोलीस दलाच्या तपासणीच्या निमित्ताने सातारा येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील 24 पोलीसांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता,त्यामध्ये औंध पोलीस ठाण्यातील येथील तिघांचा समावेश आहे.यावेळी विश्‍वास नांगरे पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाण्यांचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. औंध पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा उघडकीस आणून आरोपींकडून 93050 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सपोनि सुनील जाधव,प्रशांत पाटील,किरण जाधव यांचा सन्मान करण्यात आला.नांगरे - पाटील यांनी औंध पोलिसांचा सन्मान केल्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान आणखी चांगल्या कामासाठी प्रेरणा देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया सपोनि सुनील जाधव यांनी व्यक्त केली आहे. पोलिस आणि जनता यामध्ये समन्वय साधून आगामी काळात पोलिसांच्या कारभारात आणखी सुधारणा होतील, असेही जाधव म्हणाले.