Breaking News

सद्गुरू कृषी महाविद्यालयात रासेयो शिबीर उत्साहात


कर्जत/प्रतिनिधी
मिरजगाव येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन
तालुक्यातील मलठण या गावी झाले. या शिबीराचा कालावधी 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी एवढा होता. शिबीराचे उद्घाटन श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान मिरजगावचे अध्यक्ष उद्धवराव नेवसे यांनी केले.
उद्घाटक नेवसे यांनी शिबीराचा उद्देश भाषणात मांडला. ग्रामीण भागामध्ये पाणलोट क्षेत्र, पर्यावरण काळाची गरज, शेळीपालन विषयी मार्गदर्शन, रक्तदान शिबीर एकात्मिक शेती काळाची गरज, शरीर सदृढ राहण्यासाठी योग अभ्यास अशा विविध विषयावर व्याखानते बोलवून गावकर्‍यांना माहिती देणार असल्याचे सांगितले. मलठण हे तालुक्यातील आयडॉल गाव आहे. या गावाची निवड शिबीरासाठी करण्यात आल्याचे अध्यक्षांनी सांगितले. गावामध्ये दुग्धव्यवसाय चांगल्या पद्धतीने केला जातो. येथील सर्व उत्पादकांची नाळ संस्थेशी जोडलेली असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
यावेळी सरपंच झुंबर भिसे, उपसरपंच भाऊसाहेब धुरे, आचार्य विनोबा भावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपट खोसे, मार्केट कमिटी संचालक सुरेश भिसे, सदाबापू शिंदे, कांतीलाल मोरे, दादासाहेब वाळूंजकर, मुख्याध्यापक भालचंद्र शिंदे, तलाठी धुळाजी केसकर, ग्रामसेवक अनिल केसकर उपस्थित होते.