Breaking News

बर्फ पडल्याने स्ट्राँबेरीसह अन्य पिकांचे नुकसान


पाचगणी,  (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मिनी किा्श्मर म्हणून समजल्या जाणार्‍या महाबळेश्‍वर येथे गेल्या दोन दिवसांपासून पडणार्‍या कडाक्याच्या थंडीमुळे स्ट्रॉबेरी, मलबेरी, बटाट्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
महाबळेश्‍वरमध्ये कडाक्याच्या थंडीने पारा उणे दोन अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे स्ट्रॉबेरी पिकांसह इतर पिके कोमेजली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कल्याण, महाबळेश्‍वर तालुका कृषी विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या. एकंदरीतच नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरी ते मका मलबेरी या पिकांचा थंडीच्या कडाक्यामुळे नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने केले नाहीत, असा टाहो कृषी विभागाच्या विरोधात शेतकर्‍यांनी फोडला.
दरम्यान गेल्या चार दिवसापासून कडाक्याच्या थंडीने महाबळेश्‍वरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेन्ना लेक परिसर, लिंगमळा परिसर गुताड परिसर व परिसरातील शेतकर्‍यांच्या स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बटाटा पिकाची पाने कोमेजून गेली आहेत. काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे बर्फ पडून झाडांची पान गळती होते. तसेच काही चित्र महाराष्ट्राच्या मिनी काश्मीर महाबळेश्‍वरमध्ये पहावयास मिळत आहे. महाबळेश्‍वरमध्ये कडाक्याच्या थंडीने दवबिंदूचे रुपांतर बर्फामध्ये झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह पिकांवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांनी नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.