Breaking News

कर्जतला गजानन महाराज प्रकट दिन व पालखी सोहळा


कर्जत/प्रतिनिधी: कर्जत येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व पालखी सोहळा दिमाखात संपन्न झाला. सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव नेवसे यांच्या वतीने सद्गुरु मिल्क  अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

श्री संत गजानन महाराज मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नेवासे तालुक्यातील सनई पथकाने सनईच्या सुरात उपस्थितांचे जंगी स्वागत केले. फुलांनी सजविलेल्या पालखीत महाराजांच्या प्रतिमेचे शंकरराव नेवसे यांनी सपत्नीक गोदड महाराज मंदिर येथे आरती व पूजन करून पालखी कर्जत शहराच्या विविध भागात नेण्यात आली. पालखी सोहळ्यात कर्जत, जामखेड, श्रीगोंदे, आष्टी तालुक्यातील भाविक तसेच आकर्षक वेशभूषेत सद्गुरु शैक्षणिक संकुलातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गण गण गणात बोते, जय गजानन श्री गजानन नामघोषाने कर्जत नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. कार्यक्रमस्थळी चार हजारापेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मांदळी तसेच कर्जत येथील भजनी मंडळींनी कार्यक्रम सादर केला.

 कार्यक्रमाच्या आयोजनात सद्गुरु उद्योग समूहातील अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील भाविकांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र गोरे, अंबर भोसले, अशोक कचरे, नरेंद्र ढेरे, रविराज थोरात, सुलेमान शेख, डॉ. रामदास बिटे, अशोक उबाळे, लतेश अवसरे, ज्योती अवसरे यांच्यासह दूध संस्था चालक यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.