Breaking News

ग्रामीण भागात हेल्मेटला सक्ती , अवैध दारू बंदी का नाहीप्रशांत हिरे / सुरगाणा
जिल्ह्यातील अवैैैध दारू विक्री रोखण्याची अंमलबजावणी फक्त कागदावरच राहिलेली असून हेल्मेटला मात्र सक्ती करण्यात आली असल्याने या धोरणावर सामान्य जनतेतून मोठ्या प्रमाणात विरोधी सुरू झालेले आहे. लोकांना अपघातापासून सुरक्षित राहता यावे म्हणून पोलीस विभागाकडून हेल्मेटची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला व अंमलबजावणीही युद्धपातळीवर करण्यात आली मात्र नाशिक जिल्हात मोठ्या प्रमाणात दारू विक्री व तस्करी सुरूच आहे. मग त्याप्रमाणेच दारू बंदी सुद्धा काटेकोरपणे केली गेली पाहिजे, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे नाशिक जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा घेतलेला निर्णय हा योग्यच आहे व त्याची अंमलबजावणी सुद्धा योग्यच त्यात दुमत नाही. परंतु याच धर्तीवर दारुबंदीचीही अंमलबजावणी झाली असती तर अनेकांचे कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचविता आले असते. मात्र दारूबंदी फेल झाल्यानेच हा हेल्मेट सक्तीचा निर्णय नोटबंदी प्रमाणेच घेऊन लोकांच्या भावनेशी खेळण्याचा व स्वतःचा गवगवा करण्याचा हा प्रयन्त पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला.नाशिक जिल्हयात आजही मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेक लोकांचे कुटुंब उध्वस्त झालेली असून या अवैध दारू विक्रीत मोठ्याप्रमाणात युवक वर्गही सामील झालेला आहे. त्यामुळे तरुणांचे भविष्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने प्रथमतः दारूबंदीची कडक अंमलबजावणी करून अवैध दारू विक्री बंद करावी व त्यानंतरच हेल्मेट सक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडुन बोलल्या जात आहे.