नगर-सोलापूर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; बांधकाम विभाग सुस्त ; साईडपट्या, खड्डे बुजविण्याची मागणीकर्जत/प्रतिनिधी
नगर सोलापूर महामार्गावर झालेल्या खड्यांच्या मालिकेमुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविले जात नसल्याने दुचाकीस्वारांसह अवजड वाहतूक करणारे चालक त्रस्त झाले आहेत. महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवून घेण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

मिरजगाव ते माहीजळगाव या टप्प्यात एक फूट खोलीपर्यंतचे खड्डे पडलेले आहेत. महामार्गाच्या साईड पट्ट्या पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे या महामार्गाची पूर्णपणे वाट लागली आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. बाभूळगाव खालसा येथील हॉटेलसमोर तसेच पेट्रोल पंपासमोर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. महामार्गावरील खड्डे चुकवताना आतापर्यंत अनेक अपघात झालेले आहेत. दरवर्षी या महामार्गावर शेकडो लोक जखमी झाले असून अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे. टोलवसुली बंद झाल्यानंतर या रस्त्याची नियमित देखभाल केली जात नाही. निधी नसल्याने या महामार्गाची देखभाल केली जात नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगितले जाते. या प्रश्‍नावर नागरिकांनी आंदोलने केली सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी त्याला दाद देत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील आंदोलने मोडून काढण्याचा प्रयोगही तालुक्यात सर्रास होऊ लागलेला आहे.
मिरजगावमधून जाणार्‍या नगर-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूने मोठी अतिक्रमणे झालेली आहेत. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरुंद झाला आहे. रस्त्यावरील खड्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

आणखी किती बळी घेणार?

नगर सोलापूर महामार्गावर आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र, अद्यापही गाफील आहे. प्रशासन आणखी किती लोकांचे बळी घेणार आहे? महामार्गावरील खड्डे बुजवून साईडपट्ट्या भरून घ्याव्यात.
- प्रा.संतोष बोराटे, बाभूळगाव खालसा

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget