Breaking News

संसद भवन परिसरात कार बॅरिकेट्सला धडकल्याने गोंधळ


नवीदिल्लीः संसद भवन परिसरात एका खासदाराची कार तपासणीसाठी न थांबता पुढे जात बॅरिकेट्सला धडकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनपेक्षतपणे घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्था हाय अ‍ॅलर्टवर गेली आणि क्विक अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांनी तत्काळ संसदेला वेढा दिला.

काँग्रेसचे मणिपूरचे खासदार थोकचोम मेनिया यांची कार तपासणीसाठी सुरक्षा रक्षकांजवळ न थांबता तशीच थेट पुढे गेली आणि बॅरिकेट्सला जाऊन धडकली. त्यामुळे परिसरात मोठ्या इशार्‍याचा अलार्म वाजायला लागला. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची धांदल उडाली. जवानांनी शस्त्र सज्ज होत संपूर्ण भवनाला वेढा दिला.