Breaking News

कोणीही व्हा पण पुढारी नको - पाचपुते


श्रीगोंदे/प्रतिनिधी
शालेय जीवनात गुरुच्या ज्ञानाची शिदोरी घेत शिक्षण घेऊन पुढे जात असताना भविष्यात यशस्वी होण्यासाठी उद्योजक, व्यापारी, डाक्टर, वकील, खेळाडू, असे कोणी व्हा पण राजकीय पुढारी मात्र, होवू नका असा सल्ला जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील भिमानदीकाठी असलेल्या निमगावखलु येथे दि.23 रोजी सकाळी 10 वा. खलेश्‍वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

त्यावेळी कार्यक्रमाला सरपंच संदिप कलगुंडे, मा.सरपंच भिमराव शिंदे, उप सरपंच मारुती शिंदे, सेवा संस्थेचे मा.अध्यक्ष मारुती ढगे, विजया भोसले, बबनराव पवार, विलास होलम, बापुराव कातोरेसह. मान्यवर हजर होते.
यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले की, जीवनात जिद्द चिकाटी आणि आत्मविश्‍वास असेल तर यश मिळते. कारण जीवनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण असेल तर नोकरी सह मान सन्मान मिळेल. अन्यथा आता मुलामुलीची विवाह सुध्दा जमणार नाहीत. स्वामी विवेकानंद यांनी परिस्थिती नसताना ज्ञान मिळवून नाव कमविले. तसे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आईवडील व गुरु यांची मान खाली जाणार नाही. असे आचरण करावे. जगात आईवडील व संत हेच कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मुल व समाज घडवितात. म्हणून शालेय शिक्षण घेतल्यानंतर कोणीही व्हा पण पुढारी होवू नका कारण त्यांची परिस्थिती खुप वाईट आहे. आणि ज्याना काहीच येत नाही त्यानी राजकारणात या असा सल्ला पाचपुते यानी शेवटी दिला.
यावेळी बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे, मा.सरपंच कुंडलिक भोस


ले, हभप गजानन जाधव, टि.एस. सावळकर, पोलिस पाटील अशोक बारगळ, शिवदास जाधव, संतोष बारगळ यांच्यासह विद्यार्थी शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.