केंजळ ग्रामपंचायतीत काँग्रेसला हादरा, तीन सदस्यांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश : राजकीय भूकंपाची वाई तालुक्यात मोठी चर्चा


वाई(प्रतिनिधी) : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या व काँग्रेस पक्षाची सत्ता असणार्‍या केंजळ ग्रामपंचायतीच्या तीन विद्यमान सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने वाई तालुक्यातील कॉग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

केंजळ ता, वाई हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावाच्या ग्रामपंचायतीची 11 सदस्यासाठी पंच वार्षिक निवडणूक 2015 ला झाली होती. निवडणूकीच्या रिंगणात वाई पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती अनिल जगताप व किसनवीर कारखान्याचे विद्यमान संचालक प्रवीण जगताप या दोघांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलमध्ये अटी तटीची लढत होऊन त्यामध्ये कॉग्रेसचे 8 आणि राष्ट्रवादीचे 3 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे ही ग्रामपंचायत कॉग्रेसच्या ताब्यात ठेवण्यास प्रवीण जगताप यांना यश आले होते. अनिल जगताप, सुरेशराव जगताप यांना त्यांच्या पॅनेलचा झालेल्या पराभवामुळे हातातून निसटलेल्या ग्रामपंचायतीमुळे त्यांच्यासह कार्यकत्यांच्या जिव्हारी पराभव लागला होता. त्यामुळे त्यांनी राजकीय धूरीणत्त्व दाखवत मोठ्या कौशल्याने आणि उपसभापती पदाच्या राजकीय ताकतीचा वापर करुन सहा महिन्यापुर्वी कॉग्रेसचे सुरेश येवले आणि योजना जगताप या दोघा सदस्यांना फोडून वाईत आ. अजित पवार, आ. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत धनश्री मंगल कार्यालयात आयोजित राट्रवादी कार्यकत्यांच्या मेळाव्यात पक्षात जाहीर प्रवेश करुन घेण्यात यश मिळवले होते. त्यानंतर रविवार, दि. 10 रोजी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संपतराव जगताप, प्रताप जगताप, अमर जगताप यांनी आमदार मकरंद पाटील, अनिल जगताप, गाव कारभारी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेशराव जगताप यांच्या उपस्थितीत वाईमध्ये राट्रवादीत जाहीर प्रवेश केला. या वेळी जयंत येवले, सुनील सपकाळ, प्रभाकर चव्हाण, सुभाष जगताप आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. वरील तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सध्या ग्रामपंचायतीमध्ये राट्रवादीचे 6 सदस्य, तर कॉग्रेसचे 5 अशी बलाबल सदस्य संख्या झाली आहे. त्यामुळे कॉग्रेसचे पॅनेल प्रमुख व किसन वीर कारखान्याचे विद्यमान संचालक प्रवीण जगताप यांचे धाबे दणाणले आहेत. तर राट्रवादीच्या गोटात नवचैतन्य निर्माण होऊन खुषीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यमान सदस्य संपतराव जगताप, सुरेश येवले आणि योजना जगताप यांनी कॉग्रेसचे पॅनेल प्रमुख असलेले किसन वीर कारखान्याचे विद्यमान संचालक प्रवीण जगताप यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला कंटाळून राट्रवादी पक्षात प्रवेश केल्याचे सांगत लवकरच केंजळ ग्रामपंचायतीवर राट्रवादीचा झेंडा फडकवणार असल्याचे दै लोकमंथनच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget