Breaking News

प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील बागडपट्टीमधील हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेतील साहील सय्यद, ऋषीकेश उरमुडे, शुभम कोकणे, अनुष्का चव्हाण, अभिषेक कांबळे, सागर असलकर हे सहा विद्यार्थी डॉ. हेडगेवार विद्या प्रतिष्ठान आयोजित अहमदनगर प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले.

प्रास्तविकात मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे म्हणाले, “हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेतूनच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करुन प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळेच प्रज्ञाशोध परीक्षेत चमकदार कामगिरी करत विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.’’ सर्व गुणवंतांचा सत्कार अध्यक्ष शिरिष मोडक, संजय जोशी, सुनील रामदासी, चेअरमन मधूसूदन सारडा यांच्या हस्ते करुन अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे, मार्गदर्शक शिक्षक सौ.अरुणा धाडगे, पुरुषोत्तम देवळालीकर आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते.