Breaking News

व्याख्यानाचे मानधन सुंदरगडाच्या संवर्धनाला


पाटण,  (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचे चरित्र म्हणजे केवळ महाराष्ट्राचा फक्त इतिहास नाही तर अवघ्या भारताचे वर्तमान आणि भविष्य  आहे, असे मत सुप्रसिध्द शिवव्याख्याते युसूफ हकिम यांनी व्यक्त केले आहे. शिवजयंतीनिमित्त रामापूर (पाटण) येथे आयोजित व्याख्यानात ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
 
देशाला सुरक्षित आणि  सक्षम बनवण्यासाठी युवकांनी शिवचरित्र अभ्यासणे गरजेचे आहे. युवकांनी कोणत्याही क्षेत्रात शिवरायांच्या विचाराने वाटचाल केल्यास कधीही अपयश येणार नाही. शिवरायांचे अस्तित्व अजून गडकोटांमधे जिवंत आहे ते ज्वलंत ठेवण्यासाठी जाती पातीची बंधने, धर्म,  पक्षांच्या भिंती बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र येऊन दुर्ग संवर्धन मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे, असेही हकीम यांनी या वेळी सांगितले. तामकने प्राथमिक शाळेचा विद्यार्थी तुकाराम शिंदे यानेही या वेळी शिवचरित्रावर व्याख्यान दिलेे. या कार्यक्रमासाठी शंकराव कुंभार, अनिल भोसले, लक्ष्मण चव्हाण, अनिल बोधे, विकास घाडगे, सुहास औंधकर, दत्ता टोळे, मयूर सावंत, तानाजी भोसले, संदेश चौधरी, सूरज पंधारे, ऋषि माने शिवजयंती उत्सव समिती व सुंदरगड संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारि मावळे आबालवृद्धासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल खैरमोडे यांनी आभार मानले. या शिवव्याख्यानासाठी संयोजकांनी दिलेले सर्व मानधन युसूफ हकीम यांनी सुंदरगड दूर्गसंवर्धनासाठी भेट म्हणून याच कार्यक्रमात संबंधित समितीकडे सुपूर्द केले.