डॉ. मुंडे दाम्पत्यासह तिघांना अवैध गर्भपात प्रकरणी सक्तमजुरी


बीड / प्रतिनिधीः
राज्यभर खळबळ उडवून देणार्‍या अवैध गर्भपात प्रकरणात बीडमधील डॉ. मुंडे दाम्पत्याला न्यायालयाने दोषी ठरवले. परळी येथील डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे व महादेव पटेकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अवैध गर्भपात प्रकरणी दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील 11 आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.

मे 2012 मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. अतिरिक्त सत्र न्या. ए. एस. गांधी यांनी सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरत डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे व मृत महिलेचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवत विविध कलमांनयव्ये दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने मिलिंद वाघिरकर यांनी काम पाहिले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget