राफेल कराराच्या वेळी हटविले भ्रष्टाचाराचे नियम; काँग्रेसने सरकारवर पुन्हा केला हल्ला;मोदी लपवताहेत भ्रष्टाचार


नवीदिल्लीः सरकारने भ्रष्टाचार रोखणारे नियम हटवल्याच्या वृत्तावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. राफेल करारावर सह्या करण्यापूर्वी काही दिवस आधी खरेदी प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले. त्यामध्ये भ्रष्टाचारविरोधी काही प्रमुख नियमांना हटवण्यात आल्याचा दावा आरोप काँग्रेसने केला आहे.

राफेल विमान खरेदीप्रकरणी केंद्र सरकारने भ्रष्टाचार रोखणार्‍या काही नियमांमध्ये बदल करुन ते काढून टाकले आहेत, असा दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या वृत्ताद्वारे केला आहे. या वृत्ताचा दाखला देताना काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. असे करून मोदी कोणता भ्रष्टाचार लपवू पाहत आहेत? असा सवाल काँग्रेसने केला आहे. ‘द हिंदू’ च्या वृत्तामुळे आता या प्रकरणााला नवे वळण मिळाले आहे. संबंधित वृत्तात म्हटले आहे, की राफेल करारावर सह्या करण्यापूर्वी काही दिवस आधी खरेदी प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले. त्यामध्ये भ्रष्टाचारविरोधी काही प्रमुख नियमांना हटवण्यात आले होते.

या वृत्ताचा दाखला देताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. राहुल म्हणाले,की मोदी यांनी लूटमार केली आहे. प्रत्येक संरक्षण करारात भ्रष्टाचारविरोधी कलमे असतात. राफेल करारातील अशा भ्रष्टाचारविरोधी कलमांना हटवण्यात आले आहे. यावरून हे स्पष्ट होते, की पतंप्रधानांनी भ्रष्टाचाराला साथ दिली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीदेखील ‘द हिंदू’ ची बातमी ट्विटरवरुन शेअर करीत मोदी यांना काही प्रश्‍न विचारले आहेत. राफेल करारात ‘सॉवरन गॅरंटी’ माफ केल्यानंतर तुम्ही भ्रष्टाचारविरोधी कलमांमध्येही सूट दिली आहे. शेवटी आपण कुठला भ्रष्टाचार लपवू पाहत आहात? असे सवाल त्यांनी केले आहेत.

भाजपने दसॉल्टचा फायदा केला
सरकारने कल्पनाही केली नसेल, त्यापेक्षा जस्त वेगाने राफेल करारातील बाबी उघड होत आहेत. सुरुवातीला किंमत वाढवण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने समांतर चर्चेद्वारे भारतीय संरक्षण दलाच्या प्रयत्नांना निष्प्रभ्र केले. त्यानंतर मानक संरक्षण खरेदी प्रक्रियेत बदल केले गेले. दसॉल्ट कंपनीला या करारात फायदाच फायदा झाला आहे, असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी केला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget