
कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी मनसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. यावेळी निवेदनात म्हटले की, शासनाने दुष्काळी तालुके जाहीर केले मात्र प्रशासनाकडून त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने लाभार्थी वंचित आहेत. शासन नियमानुसार जमीन महसूल सुट, कर्जाचे पुनर्गठन, कर्जाच्या वसुलीस स्थगिती, विद्यार्थ्याना प्रवेश शुल्क सवलत, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स उपलब्ध करून देणे, वीज पंपाची जोडणी खंडित न करणे आदी सवलतींचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नायब तहसीलदार सीताराम आल्हाट यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, राहुल निंभोरे, रवींद्र सुपेकर, सुरेश पोटरे, दत्तात्रय शिपकुले, नामदेव थोरात, राजू धोत्रे आदींच्या सह्या आहेत.
Post a Comment