बॉक्सिंग अ‍ॅकॅडमीचे सागर जगताप यांचा सातार्‍यात सत्कार


सातारा (प्रतिनिधी) : गेल्या तीन- चार वर्षापासून बॉक्सिंग क्रीडाप्रकारात राज्याच्याच नव्हे तर, देशाच्या पातळीवर सातारा जिल्ह्याचे नाव सातत्याने झळकू लागले आहे. आंतरराष्ट्रीय (आयबा) प्रशिक्षक सागर जगताप यांच्यामुळे सातार्‍यात अत्युच्च दर्जाचे आणि तंत्रशुध्द बॉक्सर तयार होत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक जगताप यांच्यामुळे सातार्‍याचे नाव आणि सातार्‍यातील खेळाडू जगभरात झळकतील, असे गौरवोद्गार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे प्रशिक्षक सागर जगताप यांनी बॉक्सिंगमधील एनएस एनआयएस डिप्लोमा हा मानाचा कोर्स आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचा आयबा स्टार वन कोर्स यशस्वीरित्या पुर्ण केला आहे. आता सागर जगताप यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने घेतलेल्या आयबा स्टार टू या कोर्समध्येही उज्वल यश मिळवले. नुकत्याच झालेल्या या कोर्स परिक्षेसाठी जगभारातून प्रशिक्षक बसले होते. यामध्ये भारतातून 40 जण उत्तिर्ण झाले असून यामध्ये सातार्‍याचे जगताप यांचा समावेश आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते जगताप यांचा सत्कार करण्यात आला. य यावेळी सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे पदाधिकारी हरिष शेट्टी, अमर मोकाशी, रविंद्र होले, संजय पवार, समीर बागल, मयुर डिगे आदी उपस्थित होते. सातारा बॉक्सिंग अकॅडमीमुळे राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपर्‍यात होणार्‍या प्रत्येक स्पर्धेत सातार्‍याचे नाव झळकल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या दोन- तीन वर्षात राज्यात विविध ठिकाणी झालेल्या बॉक्सिंग स्पर्धांमध्ये सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. त्याच खेळाडूंनी देशपातळीवरही चमकदार कामगिरी करुन बॉक्सिंग क्रीडाप्रकारात सातार्‍याचा दबदबा निर्माण केला आहे. अत्यंत प्रतीकूल परिस्थितीवर मात करुन सागर जगताप सारख्या युवकाने सातार्‍यात बॉक्सिंग खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच दर्जेदार आणि नामवंत खेळाडू तयार करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. आज राज्यात आणि देशात सातार्‍याचे नाव गाजत असून जगताप यांच्या कष्टाचे चीज झाले आहे, असे अभिमानाने म्हणावे लागेल, असे आ. शिवेंद्रसिंहाजे म्हणाले. राज्य आणि देशपातळीवर सातार्‍याचे नाव झळकले आहे पण, एवढ्यावरच न थांबता बॉक्सिंगमध्ये सातार्‍याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले पाहिजे. यासाठी सागर जगताप यांनी अथक प्रयत्न करावेत. त्यांची जिद्द पाहता यामध्येही जगताप यशस्वी होतील असा विश्‍वास व्यक्त करतानाच बॉक्सिंग खेळासाठी सर्वोतोपरी मदत करु, अशी ग्वाहीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget