Breaking News

अनिल राठोड यांच्यावरील तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी; तहसीलदार विशाल नाईकवडे यांना शिवसेनेचे निवेदनजामखेड ता/प्रतिनिधी
शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावरील तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अन्यथा जामखेड शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख संजय काशीद यांनी दिला आहे.
तहसीलदार विशाल नाईकवडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावर अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. जो अहोरात्र समाजाच्या विविध प्रश्‍नासंबंधी रस्त्यावर उतरून सेवा करतो अशा आमच्या नेत्यावर राजकीय आकसापोटी व सत्तेचा दुरुपयोग करून प्रस्ताव तयार केला जातो हे चुकीचे आहे.

ही प्रस्तावाची प्रक्रिया प्रशासनाने थांबवावी. अन्यथा शिवसेना व तालुका युवा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदनावर दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र कराळे, जामखेड शहर प्रमुख संजय काशीद, तालुका युवासेना प्रमुख ऋषिकेश साळुंके, युवासेना शहर प्रमुख सुरज काळे, उपशहर प्रमुख गणेश काळे, अविनाश बेलेकर, विभाग प्रमुख गणेश उगले, महेश काळे, अविनाश सुरवसे, मंगेश वारे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.