Breaking News

वनकुटे पाणी पुरवठा योजनेसाठी एक कोटींचा निधी : फटांगरे


संगमनेर ( प्रतिनिधी )

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत संगमनेर तालुक्यातील पठार भागात टंचाईग्रस्त असणार्‍या वनकुटे गावास अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेतून 1 कोटी 18 लाख 65 हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांनी दिली .

बोटा गटात जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आम्ही पठार भागातील टंचाईग्रस्त वाड्या वस्तीवर तमाम जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. पठार भाग हा डोंगर दर्‍यांनी व्यापलेला असून या भागातील नागरिकांना रस्ते, आरोग्य व पाण्याच्या सुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे असे फटांगरे म्हणाले