Breaking News

बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव पाठीशी-आ.मुरकुटे

आ.मुरकुटे साठी इमेज परिणाम
नेवासे फाटा/प्रतिनिधी
नेवासे येथील बांधकाम कामगारांना संरक्षक संचाचे वाटप आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून त्यासाठी बांधकाम कामगारांच्या सदैव पाठीशी राहू अशी ग्वाही आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी बोलतांना दिली.
नेवासे येथील जुन्या सेंट्रल बँक चौकात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी सुदाम बनसोडे हे होते. तर कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी स्नेहल माटे, बांधकाम कारागीर प्रशिक्षक रिंकू सैनी, समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख डॉ.करणसिंह घुले, समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, कचरू शिंदे, राधाकिसन वाघ, नगरसेवक इंजिनियर सुनील वाघ, दिनेश व्यवहारे, सचिन नागपुरे, रणजित सोनवणे, माथाडी कामगारचे प्रताप हांडे, महाराष्ट्र बँकेचे कुकाणा येथील विशेष प्रतिनिधी पोपट गोरखे, ग्रामसेवक बटुळे, कामगार आयुक्त कार्यालयाचे अमोल गायकवाड, सीमा बोरुडे, शहानुर शेख उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे समर्पण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते डॉ. करणसिंह घुले यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, असंघटित कामगारांना संघटीत करण्याच्या दृष्टीने समर्पण फाऊंडेशनची नेवासे येथे स्थापना करण्यात आली. शासनाच्या विविध योजनेचा लाभ तालुक्यातील असंघटित बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मिळावा म्हणून समर्पण फाऊंडेशनच्यावतीने बांधकाम कामगारांची नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. आतापर्यंत जवळजवळ आत्तापर्यंत हजारो कामगारांना संघटीत करण्याचे काम समर्पण फाऊंडेशनने केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत असताना शासन दरबारी आ.बाळासाहेब मुरकुटे यांची चांगली साथ लाभल्याने नेवासे तालुक्यातील बांधकाम कामगारांसह जिल्ह्यात सदस्य असलेल्या कामगारांना ही शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बांधकाम कामगारांचे दैवत भगवान विश्‍वकर्माच्या प्रतिमेचे पूजन व बांधकाम मजूर मेळाव्याचे उद्घाटन तसेच उपस्थित कामगारांना संरक्षक संचाचे वाटप आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना आ. बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की, अटल विश्‍वकर्मा पेन्शन योजना ही योजना कामगारांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे म्हणून आहे. बांधकाम कामगार संघटित झाल्याने अठरापगड जातीचे बलुतेदार ही एकत्रित आले आहे. सरकारची कामगारांविषयी भूमिका ही हिताची आहे. संरक्षक किट वाटपाचा हा अभिनव कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे मजुराला हक्क प्राप्त होणार आहे. जिल्ह्यात 50 ते 55 हजार इतकी नोंदीत नोंदणी झाली आहे. तालुक्याची ही संख्या पंधरा हजारावर गेली आहे. व पुढील काळात तीस हजारपर्यंत जाणार आहे. 14 कोटीचे अनुदान जिल्ह्यात वाटप झाले असून तालुक्यातील सर्वांना याचा लाभ व अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यादृष्टीने आपण शासन दरबारी जाऊन पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी सुदाम बनसोडे यांनी कामगार हितासाठी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्‍वासन दिले. विवेक नन्नवरे, कामगार कृष्णा डहाळे, नगरसेवक इंजिनियर सुनील वाघ यांनी मनोगत व्यक्त करून कामगार हितासाठी कामगारांच्या पाठीशी राहू असे आश्‍वासन आपल्या भाषणातून दिले. यावेळी राजेंद्र परदेशी, सीमा बोरुडे, नंदू मेंगाणे, विजय जायभाय, सुवर्णा गायकवाड, रंगनाथ डुकरे उपस्थित होते.