Breaking News

किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण


कराड(प्रतिनिधी) : जिंती (साळशिरंबे) येथील महिलेला शनिवारी (दि.9) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून चिडून एकाने स्क्रू-ड्रायव्हर आणि दगडाच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केले. सुवर्णा जालिंदर गुजले (वय 45) असे जखमी महिलेचे नाव असून मारहाण करणार्‍या त्याच गावातील सागर तानाजी मेणकर याच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सागर मेणकर हा सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुवर्णा गुजले यांचा मुलगा दादासाहेब याला पैसे मागत होता. त्यावर सुवर्णा गुजले यांनी मुलास पैसे मागू नको, त्याच्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. यावरून चिडून सागर मेणकर याने खिशातील स्क्रू-ड्रायव्हरने सुवर्णा गुजले यांच्या डोक्यावर आणि खांद्यावर मारहाण केली. तसेच पळून जाताना डोक्यात दगड मारून गुजले यांना जखमी करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुजले यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून सागर मेणकर याचेवर कराड तालुका पोलीस ठ्ण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.