Breaking News

नगर कॉलेजचे कॅडेट्स, अधिकारी यांना गौरव पुरस्कार


अहमदनगर/प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आयोजित ‘युवा सन्मान सोहळा-2019’ सोहळ्यात 2017-2018 मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी, नियतकालिके, विविध विभागांचे कार्यक्रम अधिकारी व एनसीसी कॅडेट्स व अधिकार्‍यांना, विद्यार्थी विका मंडळाच्या वतीने विविध पुरस्कार देण्यात आले.

2017-2018 या शैक्षणिक वर्षातील नगर कॉलेजच्या एनसीसी विभागाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी कॅडेट्स नीलम गणगणमाले, शाहीद शेख महादेव एस. जाधव (सिटीओ) यांना ‘गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.