Breaking News

महापौर वाकळे यांनी सुरू केली कर्मचार्‍यांची ओळख परेड


अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुढाकार घेतला असून बुधवार (दि.13) पासून कर्मचार्‍यांची विभागनिहाय ओळख परेड सुरु केली आहे. या ओळख परेडच्या माध्यमातून महापालिकेतील अतिरिक्त कर्मचार्‍यांचाही शोध घेतला जाणार आहे.
महापलिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सामान्य प्रशासन विभागापासून बुधवारी दुपारच्या सत्रात या ओळख परेडला प्रारंभ झाला. सामान्य प्रशासन विभागात किती कर्मचारी काम करतात, कोणाकडे कोणता टेबल आहे. याची माहिती त्यांनी घेतली.

तसेच कर्मचार्‍यांशी थेट संवादही त्यांनी साधला.त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या शिवाय या विभागात कामाबाबत समाधानी आहात काय? अन्य विभागात काम करण्याची इच्छा आहे काय? याचीही माहिती त्यांनी घेतली.या विभागात किती कर्मचार्‍यांवर कामाची स्वतंत्र जबाबदारी नाही याचीही माहिती घेतली. सामान्य प्रशासन विभागानंतर त्यांनी प्रसिद्धी विभागातील कर्मचार्‍यांशीही संवाद साधला.