Breaking News

माणदेशी माडग्याळ मेंढ्यांचा राष्ट्रीय पशु प्रदर्शनामध्ये गौरव


बिदाल (प्रतिनिधी) : जालना येथे भरविण्यात आलेल्या देश पातळीवरील भव्य पशु प्रदर्शनामध्ये माण तालुक्यातील माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नरवणे ता. माण येथील हनुमंत पांडुरंग करे यांना पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र अशा स्वरूपात देण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आबा नाना ठोंबरे, (रा. काळेवाडी, ता. माण) यांना पंधरा हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह व सन्मानपत्र तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक युवराज श्रीरंग महानवर (काळेवाडी, ता. माण) यांना 11 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र स्वरूपात देण्यात आलेे. मेंढीमालकांनी ही पारितोषके स्विकारले. त्यानिमित्ताने दहिवडी येथे पारितोषकप्राप्त मेंढपाळाचा मामूशेट विरकर, अर्जून काळे आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.