Breaking News

महाबळेश्‍वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये कात टाकणार : बेल एअरमुळे आशावादसातारा (प्रतिनिधी) : महाबळेश्‍वर ग्रामीण रुग्णालय तालुक्याचे आरोग्यदायी सेवा देणारी आहे. मात्र, परिपुर्णता सेवा देण्यास असमर्थ ठरली होती. अनेक अडचणी वारंवार उदभवत होत्या. अधिकारी-पदाधिकारी यांनीही वेळो-वेळी भेटी देऊन प्रशासकीय सूचनाही दिल्या जात होत्या. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा अभाव होता. आता बेल एअर हॉस्पिटलने ताबा घेतल्याने कात टाकून हळूहळू सर्व सुविधा मिळतील, असा आशावाद निर्माण झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.

रुग्णसेवेसाठी इंडियन रेड क्रॉस संचलित बेल-एअर हॉस्पिटल, पांचगणी यांच्याकडे हस्तांतरित झाले आहे. तेव्हा हॉस्पिटल प्रशासन सर्व महाबळेश्‍वर तालुकावासियांसाठी आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध आहे. या सेवांचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.अजित प्रभाळे यांनी केले आहे. परिपूर्तता करण्यासाठी लवकरच आय.सी.यु.ऑपेशन थिएटर, जनरल वॉर्डस, एक्सरे, आणि सर्व रक्त तपासण्या सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यकाळ उज्वल आढळून येत असून वाईवरून सातार्‍यास जाण्याची आवश्यकता नाही.
त्यामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुर्गम भागात आरोग्याची चांगली सुविधा निर्माण होत आहे.