पाण्यासाठी आमदारकीची सर्व ताकत पणाला लावू आ. शंभूराज देसाई यांचे साखरीतील जाहीर सभेत प्रतिपादनकराड, (प्रतिनिधी)- गेल्या चार वर्षातच पाटण विधानसभा मतदारसंघातील मोठया व मध्यम धरण प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली असून तारळी आणि मोरणा- गुरेघर या धरण प्रकल्पांच्या प्रमाणे मणदुरे व केरा या विभागातील शेतकर्‍यांना निवकणे, चिटेघर व बिबी मध्यम धरण प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी देण्यास मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून कटीबध्द आहे. माझी आमदारकीची सर्व ताकत या विषयासंदर्भात शासनाकडे मी लावणार असून पाणी मुद्यावर मणदुरे आणि केरा विभागातील जनतेने एक होण्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले. साखरी ता.पाटण येथे मणदुरे आणि केरा विभागातील निवकणे, चिटेघर व बिबी मध्यम धरण प्रकल्पांची कामे पुर्णत्वाकडे नेवून या प्रकल्पातून ठिकठिकाणी कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधून या विभागातील शेतकर्यांना शेतीला पाणी मिळवून देणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी परीषद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मुक्ताबाई माळी, माजी सदस्य सुरेश जाधव, कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, तानाजीराव घाडगे, मधूकर भिसे, बापूराव सावंत, विलास कुर्‍हाडे, बबनराव माळी, लक्ष्मण सकपाळ, कृष्णत देसाई, शंकरराव पाटील, बशीर खोंदू, नगरसेवक गणीभाई चाफेरकर, अशोकराव पाटील, राजेंद्र पाटणकर, भरत साळुंखे व संजय जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget