दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक; दोन जण फरार


जामखेड/प्रतिनिधी
दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अटक केली असून दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचा गून्हा दाखल करून तीघांना न्यायालयात हजर केले असता 16 फेब्रूवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर असे की, पो.कॉ. अझहरूदीन ईस्माइल सय्यद यांनी दिलेेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जामखेड पोलिसांचे एक पथक फरार आरोपीच्या शोधासाठी दि.12 रोजी 9.30 दरम्यान गस्तीवर होते. हे पथक शहरातील करमाळा चौक परिसरातील हॉटेल चौफुला समोर थांबले असता. करमाळा रोडने दोन मोटरसायकली भरधाव वेगाने खर्डा रोडने पळून जात असल्याचे दिसले. त्यावरून पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांचा पाठलाग करून त्या दोन्ही मोटरसायकली खर्डा रोडवरील हॉटेल महेश समोर पोलिसांनी सरकारी वाहन आडवे लावून थांबवले असता एका मोटरसायकलवरील तीन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. व अंधाराचा फायदा घेऊन दोन जण रोडच्या कडेने शेतातून पळून गेले. पकडलेल्या इसमांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी दीपक बाळू कांबळे (वय 19) रा. मिलिंद नगर जामखेड, विजय अशोक माने (वय 19)रा. कैकाडी गल्ली नगर जामखेड, दिलीप साळुंखे (वय 39) राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर, हल्ली मुक्काम बीड कॉर्नर जामखेड असे सांगितले. तसेच त्यांना पळून गेलेल्या दोन जणांचे नाव विचारले असता त्यांचे नाव न सांगता उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यांना सदर रोडने वेगाने रात्री जाण्याची कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्या इसमांवर जास्त संशय बळावला. पोलिसांनी त्यांना जागीच पकडून ठेवून पोलिस हेड कॉन्स्टेबल बापु गव्हाणे यांनी लागलीच दोन पंचांना बोलावून त्या पंचांसमक्ष त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या कब्जात असलेले दोन गज, मिरची पूड व किमतीचे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. तसेच 20 हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची (एमएच 16 ऐव्ही 3161) व हिरो होंडा ड्रीम युगा कंपनीची बिगर नंबरची काळ्या रंगाची अशा दोन मोटारसायकलसह आरोपींना पोलिस ठाण्यात आणले.दि.13 रोजी सकाळी न्यायालयात हजर केले असता 16 फेब्रुवारी पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.बापु गव्हाणे करत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget