Breaking News

मोताळ्यात फटाके फोडले


मोताळा : पुलवामा हल्ल्याच्या कारवाईचा बदला घेत भारताने पाकिस्तानवर  केलेल्या कारवाईचा 26 फेब्रुवारी रोजी येथील बसस्थानक चौकात सर्वधर्मीय  नागरिकांनी फटाके फोडून व जल्लोष करत आनंद व्यक्त केला. येथील बसस्थानक  चौकात सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन पाकिस्तान  मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

त्यानंतर फटाके फोडून या बदल्याचा आनंद व्यक्त केला. या वेळी डॉ. रवींद्र  महाजन, रामदास चौथनकर, राजेश पडोळकर, सचिन हिरोळे, विजय सुरडकर,  विश्‍वंभर लांजुळकर, सचिन महाजन, सुरेश भिडे, सुमित पाटील, बाबा कुरेशी,  गणेश फालक, विजय जवरे, शुभम नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.