Breaking News

मटका व जुगारअड्डे जोमात, कारवाईची नागरिकांकडून मागणी


खरवंडी कासार/प्रतिनिधी: खरवंडी कासार, मीडसांगवी, भालगाव, टाकळीमानूर  अशा मोठ्या गावांमध्ये मटका अड्डे व जुगारअड्डे  मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे चित्र आहे.  प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून  यावर कसलीही कारवाई प्रशासन  करत नाही. यामुळे अनधिकृत धंद्यांमध्ये  वाढ झाली असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे असा आरोप नागरिक करत असून  तालुका पोलिस प्रशासनाने याची दखल घेत अवैधरीत्या गुन्हेगारी व जुगारअड्डे चालवणार्यानवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. 

खरवंडी कासार पंचक्रोशीत संत भगवान बाबा विद्यालय व संत भगवान बाबा जुनिअर काॅलेज आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांवर  याचा विपरीत परिणाम होत आहे. महान संताच्या पविञ भुमीत गुन्हेगारी, अवैध धंदे ,जुगारअड्डे, मटका अड्डे चालू  असण दुर्दैवच असल्याची चर्चा ग्रामस्थ करत आहेत. परंतु या अवैध धंदे करणाऱ्यांची दहशत एवढी आहे कि लोक तक्रार करण्यासही धजावत नाहीत.  पोलीस प्रशासनाने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे . तसेच लोकप्रतिनिधी व  पालकमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.