सातार्‍यात समर्थसदनामध्ये दासबोध पारायणास प्रारंभ


सातारा,  (प्रतिनिधी) : येथील श्री समर्थ सदनामध्ये श्रीसमर्थ सेवा मंडळाच्या वतीने सध्या दासनवमी उत्सवांतर्गत सामुदायिक दासबोध पारायण सुरु झाले आहे. या पारायणासाठी मंडळाचे कायर्ंवाह मारुतीबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थभक्त आनंदबुवा भाकरे रामदासी यांच्या माध्यमातून प्रमुख वाचन होत आहे. सकाळी आठ ते साडेअकरा या वेळेत समर्थाच्या ग्रंथराज दासबोधाचे सामुदायिक वाचनाचा कार्यक्रम 27 फेब्रुवारीपयर्ंंत सुरु रहाणार आहे.

 वाचनादरम्यान आनंदबुवा रामदासी यांचेकडून या श्र्लोकांचे विवेचनही केले जात आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मन:शांतीसाठी दररोज समर्थाच्या वाड:मयाचे वाचन करणे अतिशय उपयोगी आहे. या विचारातून प्रत्येकाने आपले जीवन समृध्द, आनंदी, विनात्रासाचे,तणाव विरहीत आणि संपन्न करण्यासाठी दासबोध वाचनातून मिळणारे मार्गंदर्शन हे मोलाचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
या दासबोध पारायणासाठी सातारा शहर परिसरातील 120 हून अधिक स्त्री व पुरुष सहभागी झाले आहेत. वयोवृध्दांसाठी वाचनाचे वेळी खास आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. दासबोध पारायणाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे मधुकर बाजी, मुकुंद लांडगे, राजु कुलकर्णी, रवीबुवा आचार्य, सौ.कल्पना ताडे आदी विशेष परीश्रम घेत आहेत. दि. 27फेब्रवारी रोजी दासनवमीला सकाळी या पारायणाची सांगता होवून प्रसाद वितरण होणार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget