Breaking News

खंडाळ्यात टँकर उलटून केमिकलने घेतला पेट


वाई (प्रतिनिधी) : पुणे -सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता नायट्रिक ऍसिड केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु, टँकरमध्ये नायट्रिक ऍसिड केमिकल असल्याने त्या केमिकलने पेट घेतला.

याची दुर्गंधी परिसरात मोठ्या प्रमाणात पसरली असून या केमिकलचा दुष्परिणाम काय होणार या भितीमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली. भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत प्रतिबंधक उपाय योजना म्हणून किसनवीर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. वाहतुक सुरळीत करून पोलिसांनी जखमी टँकर चालकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. नायट्रिक ऍसिडचा टँकरमधून वाहणारा प्रवाह व त्यापासून होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रशासनाने मदत कार्य सुरु केले आहे.