Breaking News

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात स्वास्थ्य आणि राजयोगध्यानाचे प्रशिक्षण

नेवासेफाटा/प्रतिनिधी

येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात मानसिक स्वास्थ्य आणि राजयोगाध्यानाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना व आशा स्वयंसेविकांना स्वास्थ्य व राजयोगाचे धडे देण्यात आले.शरीर स्वास्थ्यासाठी राजयोगाचे सात दिवशीय प्रशिक्षण हे आरोग्याला नवसंजीवनी देणारे असल्याने हे सात दिवशीय प्रशिक्षण सर्वांनी पूर्ण करावे असे आवाहन नगर येथील नेत्र तज्ञ डॉ.सुधा कांकरिया यांनी यावेळी बोलताना केले.

याप्रसंगी ब्रह्मकुमारी लतादीदी, साहेबराव घाडगे पाटील, स्नेहल घाडगे, प्रिया बहन, इंगळे, जितेंद्र कुरेशिया ,भरतभाई गोरे, यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षिका ,आशा स्वयंसेविका, डॉक्टर वैशाली चावरे, डॉक्टर अमित गोसावी, डॉक्टर दरंदले, डॉक्टर साळुंखे ,पोलीस पाटील राम शिंदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते