Breaking News

डेसिमीन कंपनीविरोधातील लोणंदमधील उपोषण मागे


लोणंद,  (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसीमध्ये असलेल्या डेसिमीन कंट्रोल सिस्टीम या कंपनी विरोधात भुमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या जयेश कुदळे यांचे उपोषण भाजपा नेते पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते सरबत घेऊन त्यांनी मागे घेतले आहे

लोणंद औद्योगिक वसाहतीतील डेसिमीन कंपनीने कायमच प्रकल्पबाधिताच्या मुलांच्या नोकरी संदर्भातील मागणीकडे दुर्लक्ष केले होते. ज्यावेळी शेतकर्‍याच्या जमिनी औद्योगिकरणात गेल्या, त्यावेळी त्या कुटुंबियांना प्राधान्याने कायमस्वरूपी रोजगार देण्याचे लेखी आश्वासन कोल्हापुरच्या औद्योगिक विकास महामंडळाने दिले होते. ते पुर्ण न केल्याने प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळावा यासाठी उपोषणाला बसलेल्या जयेश कुदळे यांची पुरुषोत्तम जाधव यांनी भेट घेऊन कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा केली.

कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरूणांना प्राधान्याने कामावर घेऊ, व आता कामावर कार्यरत असलेल्या कामगारांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी करण्याचे तसेच ठेकेदार जर कामगारांच्या घामाचे पैसे खाऊन पिळवणूक करीत असतील तर अश्या ठेकेदारांवर सक्त कारवाईचे ठोस आश्र्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.यावेळी सागर चांदसकर, प्रशांत जाधव, नवनाथ शेळके, भूषण शिंदे, लोणंद पोलिस स्टेशनचे कर्मचारी, व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.