Breaking News

रेडीओ किसान दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र दिघोळआंबा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन


बीड : प्रतिनिधी
कृषी विज्ञान केंद्र, दिघोळआंबा येथे रेडीओ किसान दिनानिमित्त जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये शेतक-यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबाग वाचवण्याचे तंत्रज्ञान, चारा टंचाई काळामध्ये पशुधनाचा सांभाळ आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये पीक व्यवस्थापन या विषयावर प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे. १५ फेबु्रवारी हा दिवस भारतात रेडीओ किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आकाशवाणी बीड, आत्मा यंत्रणा, दीनदयाल शोध संस्थानचे कृषी विज्ञान केंद्र, दिघोळआंबा यांच्या संयुक्त विद्यामाने १५ फेब्रुवार शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ.प्रितम मुंडे, आ.संगिता ठोंबरे, डॉ.अशोक ढवण, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पुणे येथील संचालक डॉ. लखणसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आणि दीनदयाल संस्थेचे प्रमुख कमलाकर अंबेकर इत्यादी उपस्थित रहाणार आहे. शेतकरी बंधू भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसार भारती आकाशवाणी बीड यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.