Breaking News

पाडळी रांजनगावची विकासकामे प्रभावित करणारी-फाळके


पारनेर/प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव ग्रामपंचायतच्या सव्वा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच उद्योजक गुलाबराव करंजुले यांना ग्रामरत्न पुरस्कार प्रदान सोहळा माजी आ. दादाभाऊ कळमकर यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी बोलताना फाळके यांनी फक्त ग्रामपंचायतच्या सत्तेच्या जोरावर येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकर्‍यांनी सव्वा कोटींची केलेली विकासकामे प्रभावित करणारी आहेत असे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नीलेश लंके, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, अशोकराव सावंत, सभापती प्रशांत गायकवाड, मधुकर उचाळे, उपसभापती दीपक पवार, सुदाम पवार, प्रीती जाधव, दादाभाऊ वाखारे, महेंद्र वाखारे, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, युवक अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, शंकरराव नगरे, उद्योजक संतोष कळमकर, उद्योजक बाळासाहेब करंजुले, बापू शिर्के, संतोष काटे, सरपंच वैशाली करंजुले आदी मान्यवर होते.

यावेळी बोलताना फाळके म्हणाले की, पाडळी रांजणगाव येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकासकामे पाहुन आपण प्रभावित झालो आहे. विक्रमसिंह कळमकर व सहकार्‍यांनी विविध योजनाद्वारे हा निधी मिळवल्याबद्दल त्यानी कौतुक केले. तसेच पवार हेच आपले कैवारी असून त्यांच्यामुळेच महिलांना सन्मान मिळाला आहे. त्यांच्या धोरणामुळेच या गटाच्या तसेच गावच्याही प्रथम नागरीक महिलाच असून आता आगामी लोकसभेलाही दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीकडून महिलाच उमेदवार असणार आहेत. त्यामुळे सर्वांनी राष्ट्रवादीच्या पाठीशी रहावे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजेनेतून कळमकरवाडी येथील पाझर तलाव दुरुस्ती, 14 व्या वित्त आयोगातून प्राथमिक शाळेला 7 एलईडी टीव्ही संच प्रदान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनेतून 10 लक्ष पाणीपुरवठा योजना तसेच 21 लक्षचे रस्ता कॉक्रिटीकरण सह शालेय विद्यार्थ्यांना सायकल व झेरोक्स मशीन वाटप कार्यक्रम पार पडला.

यावेळी उमेश परहर यांनी स्मशानभूमी साठी 10 लाख निधी देण्याचेही जाहिर केले. ग्रामरत्न पुरस्काराला उत्तर देतांना उधोजक गुलाबराव करंजुले पाटील यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकर्‍यांचे आभार मानले. तसेच गावाची वाटचाल विकासाकडे होत असून काम करणार्‍यांच्या पाठीशी उभे रहान्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. आपण गावासाठी आधुनिक व्यायाम शाळा व प्रवेशद्वार बांधून देनार असल्याचे गुलाबराव करंजुले यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला जेष्ठ नेते मारुती उबाळे, अप्पा साठे, दादाभाऊ घावटे, नवनाथ उघडे, सुरेश उबाळे, विट्ठल साठे, किरण साठे, भाऊ उबाले, माजी सरपंच जयसिंग मापारी, वैभव काळे, अरुण घनवट, इंद्रभान गाडेकर, बबनराव खोले, रमेश शेळके, सरपंच संदीप मगर,उपसरपंच दौलत गांगड़, दादा शिंदे, सरपंच संदीप गाडेकर, अविनाश खंदारे, संतोष गांगड, अप्पासाहेब रसाळ, सुभाष ढोरमले, रोहिदास पठारे, जालिंदर शेळके, कारभारी पोटघन, अमोल शेळके, विट्ठल मुंगसे, मंगेश काळे, भाऊसाहेब लटांबळे आदीसह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.