Breaking News

ओझर्डे परिसरात हळद काढणीची लगबग


वाई (प्रतिनिधी) : वाई तालुक्यातील हळद पिकांचे आगार समजल्या जाणार्‍या ओझर्डे परीसरातील अनेक शेतकर्‍यांची हळद या नगदी पिकांचे काढणीला सुरवात केली आहे. त्यामुळे ज्यास्त मजुरीसाठी पैसे देऊन मजुरांची पळवापळवी सुरु झाल्याने या स्पर्धेत सामान्य शेतकरी अडचणीत सापडला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि वाई तालुक्यातील ओझर्डे परिसरातील गावांमधील शेतकरी हे पिढ्यानपिढ्या स्पर्धात्मक हळद या जातीचे पिक लाखो रुपये खर्च करून घेतात. काय दराने हळदीची विक्री होईल याची पर्वा न करता ना नफा ना तोटा या राम भरोश्याच्या विश्‍वासावर शेतकरी शेकडो एकराची लागण करतात. आपले हळदीचे पीक कसे चांगले येईल या साठी हजारो रुपयांचे शेण खत आणुन जमिनीवर ओतले जाते व ईतर रासायनिक खते वापरली जाऊन आपले पिक ईतर शेतकर्यान पेक्षा कसे देखणे येईल यासाठी अनेक शेतकरी हे गावच्या विकास सेवा सोसायटीचे बॅकेंचे आणी इतरांकडून कर्ज काढून वर्ष भर पिकाला लहान मुलांप्रमाणे त्याचा सांभाळ करत असतो. लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असताना देखील जानेवारी महिन्यात हळद काढणीसाठी पुन्हा हळद व्यापार्‍याकडून पिकांच्या काढणी साठी हजारो रुपये आणून काढणीला सुरवात करतात. हळद काढून ती शिजवून वाळवून ड्रमने चकाचक करुन पोत्यात भरुन ती विक्रीसाठी बाजार समितीच्या काट्यावर शेतकरी पोहोचतो. आता मला लाखो रुपये मिळणार? येणार्र्‍या पैशातून मी कर्ज मुक्तच होणार अशी आशा शेतकरी बाळगतो. मात्र तेथील व्यापार्‍यांच्या टोळीने प्रती क्विंटलला काढलेला दर ऐकून तो हताश होतो. मी बायको मुलांसह वर्षभर मोठ्या आशेने राबून येणार्‍या पैशातून घर बांधून मुलाचे, मुलीच लग्न करेन. तर काही जण मुलांना उच्च शिक्षणासाठी खर्च करण्याची अपेक्षा उराशी बाळगून होते पण ढासळलेला दर ऐकून आपण घेतलेली कर्जे कशी फेडणार? या चिंतेने वाई तालुक्यातील शेतकरी ग्रासलेले आहेत.