Breaking News

जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंव्यागांचे आंदोलन


शेवगांव/प्रतिनिधी: जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांच्या अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब महापुरे संस्थापक अध्यक्ष सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनशक्ती दिव्यांग विकास आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष चाँद शेख नेतृत्वाखाली शेवगाव तहसील कार्यालयाकडून दिव्यांगावर झालेल्या अन्यायाबाबद व विविध प्रश्‍नावर तीव्र आंदोलन करण्यात आले.

 यामध्ये प्रामुख्याने मागण्या सर्वं दिव्यांग बांधवांना अंत्यदोय व प्राधान्य कुटुंबात समावेश करून तात्काळ धान्य वितरण सुरू करणे, आज अखेरपर्यंत ज्या दिव्यांग बांधवांचे रेशनकार्ड ऑनलाईन केलेले नाही ते तात्काळ ऑनलाईन करणे, दिव्यांग पेन्शनमध्ये वाढ झालेली आहे. परंतु आजअखेर पर्यंत अजून वाढीव पेन्शन मिळाली नाही ती तात्काळ वर्ग करण्यात यावी, येथून पुढे महिन्याच्या महिन्याला नियमितपणे दरमहा पेन्शन मिळावी धान्य घेतल्यावर पावती मिळावी, याबाबद नायक तहसीलदार भानुदास गुंजाळ, पुरवठा निरीक्षक चिंतामणी यांच्याशी चर्चा झाली. यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल व दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले.

यावेळी जनशक्ती दिव्यांग विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी चाँद शेख, संभाजी गुठे, संदीप चेडे, नवनाथ औटी, सयाजी रंधवे, भाऊसाहेब गव्हाणे, सुवर्णा देशमुख, मंदा पवार, सकू मिसाळ, वंदना तुजारे, मंगल शिंदे, अदमाने संजीवनी, भरत साळुंके, बबन केसभट, किशोर अंगरख, शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव बाळासाहेब फटांगडे, गंगाभाऊ खेडकर, दक्षता समिती सदस्य जलील राजे, आगळे तसेच तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवानी उपस्थित होते.