शेतकर्‍यांची मुले शिकली पाहिजे - चैताली काळेकोपरगाव ता/प्रतिनिधी
माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना काकडी सारख्या दुष्काळी भागात 2003 साली संस्थेची शाळा सुरु केली. त्यामुळे शेतकर्‍यांची व कष्टकर्‍यांची शेकडो मुले इंजिनिअर व मोठे पदाधिकारी झाले. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सर्वाना शिक्षण मिळालेच पाहिजे. शेतकर्‍यांची व कष्टकर्‍यांची मुलं शिकलीच पाहिजे. ही काळे परिवाराची विचारधारा आहे. असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका व संस्थेच्या सचिव चैताली काळे यांनी केले.
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कुल काकडी या शाळेचा विविध गुणदर्शन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका व संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, काकडी शाळेची स्थापना करून कर्मवीर काळे यांनी या शाळेचे रोपटे लावले. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आज काकडी गावात विमानतळ आले. परिसरात बदल झाला. शाळेची मोठी इमारत उभी राहिली. तरीही शाळेत मुलांकडून फी घेतली जात नाही. सर्व वर्गांच्या एकापेक्षा जास्त तुकड्या आहेत. शाळेची प्रगती अतिशय चांगली आहे. आपल्यासाठी अनेक कष्ट सोसून आपल्या सर्व गरजा पूर्ण करणार्‍या आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची नेहमी जाण ठेवा. चांगला अभ्यास करून नावलौकिक कमवा मोठे व्हा. आयुष्यात पैसे कमविणे ही श्रीमंती नसून मनाची श्रीमंती महत्वाची असल्याचा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी चैताली काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आपले कलागुण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी प्रभाकर गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, उपसरपंच मंगल डांगे, मधुकर सोनवणे, पोलिस पाटील मधुकर गुंजाळ, मल्हारवाडीचे पोलिस पाटील बाबासाहेब गुंजाळ, शागिर शेख, देर्डे शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget