Breaking News

वर्धनगडच्या उपसरपंचपदी अविनाश पाचांगणे


पुसेगाव, (प्रतिनीधी) : खटाव तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असणार्‍या किल्ले वर्धनगडवरच्या उपसरपंचपदी अविनाश पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली. गेल्या दोन महीन्यापुर्वी तेथे झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अर्जून मोहीते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता आली होती व सरपंच अर्जून मोहीते विक्रमी मताने निवडून आले होते. त्यानंतर आता उपसरपंचपदी अविनाश पाचांगणे यांची निवड झाल्याने पाचांगणेआळी आणि गावात त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला

निवडीनंतर सत्कारप्रसंगी उपसरपंच अविनाश पाचांगणे म्हणाले, गावाच्या विकासासाठी मी कटिबध्द असून सरपंच अर्जुनआप्पांच्या नेतृत्वाखाली चांगले कार्य करून गावकर्‍यांच्या विश्र्वासाला पात्र ठरेन.
यावेळी माजी उपसरपंच अर्जून कुंभार, तुकाराम चव्हाण, शंकर घोरपडे, शंकर चव्हाण, अनुराधा पवार, प्रेमला कदम, उज्वला मदने, कलावती शेटे, हुसेनभाई शिकलगार, भरत मोहीते, परशुराम शिंदे, हणमंतराव पाचांगने, तानाजी पाचांगने, शामराव फडतरे आदी मान्यवर ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.